ब्राह्मणगाव प्रतिनिधी -संदीप पेंटेवाड
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ब्राह्मणगाव येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेच्या पाईप लाईन चे उद्धघाटन करण्यात आले.
उन्हाळा आता जवळ येत असून गावाला पाणी टंचाई भासू शकते हे बाब हेरून सदर पाणीपुरवठा योजनेची सुरवात करण्यात आली आहे.
यावेळी माजी पं स सदस्य परमात्मा गरुडे, अरविंद धबडगे, माजी उपसरपंच सोनबा घोडेकर, देवराव पाटील मोरे, जांभळे, सुरोशे, भारत वाठोरे, अशोक निम्मलवाड, कलामभाई, राजकुमार विणकरे, रमेश नालमवाड, तुकाराम पावडे, संदीप गोरे, रामा घोडेकर, अवधूत बिटेवार, व गावकरी उपस्थित होते.

0 टिप्पण्या