ढाणकी प्रतिनीधी- हिंदुहदयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नामफलकाचे अनावरण दिनांक 23 जानेवारी रोजी त्यांच्या जयंती निमीत्त फुलसावंगी फाटा येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शाखा ढाणकीच्या वतीने करण्यात आले होते. फलकाचे अनावरण ढाणकी शहराचे नगरअध्यक्ष श्री सुरेशलालजी जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले असुन या वेळी शहरातील सर्व मान्यवर नगरसेवक, प्रतिष्ठीत व्यक्ती, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्ता सुरोशे यांनी केले तर प्रस्ताविक शहरप्रमुख बंटी उर्फ विजय जाधव यांनी केले.

0 टिप्पण्या