ढाणकी प्रतिनिधी -
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीमधील राजकारणाला वेगळे वळण लागले. बऱ्याच ठिकाण चे निकाल हे धक्कादायक होते. या वर्षीच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील बऱ्याच ग्रामपंचायत वर युवकांना संधी दिली.
असेच एक उदाहरणं द्यायचे झाल्यास उमरखेड तालुक्यातील खरूस खुर्द चे द्यावे लागेल. यावर्षीच्या निवडणुकी मध्ये खरूस ग्रा प वर सर्व सदस्य हे नवीन व युवक असून गावातील जेष्ठ नेत्यांनी हसत हसत ग्रामविकासाची जबाबदारी या युवकांवर सोपवली आणि गावाचा विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
ग्रामपंचायत च्या राजकारणात विरोधक हे फक्त निकाल लागो पर्यंत असतात एकदा निवडणुकीचा निकाल लागल्या वर सर्वांनी मिळून गावाचा विकास करायचा व गावाला आदर्श ग्राम बनवायचे असते असे वक्तव्य खरूस मधीलच एका जेष्ठ व्यक्तींनी बोलताना केले.
नवनिर्वाचित सदस्यांमध्ये शोभाबाई अमरसिंग राठोड, मीराबाई श्रावण जाधव, नंदा शाहू राठोड, पंचफुला नारायण दुप्पलवाड, धम्मपाल गोरखनाथ सावतकर, कर्मवीर तानाजी ब्रीदाळे हे असून यांच्यावरच आता ग्रामविकासाची धुरा आहे.
खरूस खुर्द मध्ये जरी अनेक वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले असले तरी विरोधकांनी सुद्धा या जन कौलाचा आनंदाने स्वीकार केल्याचे बोलले जात आहे.
नवीन सदस्य आता कश्या प्रकारे गावसमस्याना हाताळून ग्रामविकासाकडे लक्ष देतात या कडे गावकऱ्यांचे लक्ष लागून असून नवनिर्वाचित सदस्यांना निवडून येण्या मध्ये फकिरा जाधव ( मा. तंटामुक्त अध्यक्ष), शामराव पाटील गाडेकर, धनसिंग राठोड, तुकाराम नाईक, आनंदराव थावरा, शामराव ब्रिदाळे, माधव सोनेवाड, रमेश कारभारी, नामदेव नलेवाड, सुभाष दुप्पलवाड (माजी सरपंच), तानाजी ब्रिदाळे (माजी सरपंच), सदानंद हटेवाड, चंदन जाधव, सटवा वाढवे, दिगंबर वाढवे, विठ्ठल सावतकर, सय्यद इस्माईल, सय्यद जब्बार, सय्यद हुसेन, दत्ता वाढवे, किसन वाढवे यांचा सुद्धा सिंहाचा वाटा असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
आम्हाला गावकऱ्यांनी विश्वासाने निवडून दिले असून आम्ही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे नवनिर्वाचित सदस्यांनी बोलताना सांगितले.

0 टिप्पण्या