ढाणकी प्रतिनीधी-
अतिशय प्रतिष्टेची समजली जाणारी ग्रामपंचायत निवडणुकीत या वर्षी अनेक मातब्बरांना जबर धक्के बसले असुन मतदारांनी आपली मते युवकांच्या टोपलीत टाकली आहेत त्यामुळे संपुर्णतः राजकीय गणिते बदललेली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे महत्व ग्रामिण भागात खुप असुन अतिशय अतितटीची अशी ही निवडणुक समजल्या जाते. अनेक वर्शापासुन ग्रामपंचायतीवर आपली पकड ठेवुन बसलेल्या मातब्बर राजकारणी लोकांना मात्र या वर्षी जनतेने सपशेल नाकारल्याचे चित्र ग्रामिण भागात पाहावयास मिळत आहे.
या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत कभी ख़ुशी कभी गम चे चित्र दिसले. ढाणकी येथुन जवळच असलेल्या खरूस खुर्द ग्रामपंचायत वर या वर्षीचं निवडणुक रिंगणात उतरलेल्या नवयुवकांना मतदारांनी संधी दिली असुन पॅनल प्रमुख कर्मवीर ब्रिदाळे यां युवानेतृत्वांच्या नेतृत्वात सहा पैकी सहा जागा जिंकत खरूस खुर्द ची ग्रामपंचायत आपल्या हाती आणली आहे. तर भाजप तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते यांचे गावी सावळेष्वर येथे त्यांच्या पॅनल ला हारीशी सामणा करावा लागला आहे. आकोली , परोटी, या गावांची स्थिती सुध्दा याच प्रमाणे असुन प्रस्थापितांना नाकारून नवयुवकांना येथे संधी देण्यात आली आहे.
बिटरगांव बु येथे सुध्दा नविन चेहरा भास्कर देवकते यांनी विजयश्री खेचत आणत आपला विजय निष्चित केला. खरूस खुर्द येथे अनेक दिवसांपासुन पाटलांची सत्ता होती ती आता या नवयुवकांनी मोडुन काढली. जनतेने कर्मवीर ब्रिदाळे व त्यांच्या पॅनलवर विश्वास टाकत विजयाची माळ त्यांच्या गळयात टाकली आता ते जनतेचा विश्वास किती खरा करून दाखवतात याकडे खरूसकरांचे लक्ष आहे.
प्रतिक्रीया-
आम्ही निवडणुकीचा कोणताही अनुभव नसताना निवडणुक रिंगणात उतरलो आणि जनतेने सुध्दा आमच्यावर विश्वास ठेवत आम्हाला बहुमतात निवडणुन दिले. मी समस्त खरूस करांचे आभार माणतो व त्यांच्या कसोटीवर खरा उतरण्याचा पुर्ण प्रयत्न करीन. संपुर्ण ग्रामविकास हाच आमचा अजेंडा आहे.
कर्मवीर ब्रिदाळे
पॅनल प्रमुख खरूस खुर्द

0 टिप्पण्या