उमरखेड चे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप.



“जिव्हाळा मायेची ऊब” या अनोख्या उपक्रमा द्वारे 

(लोकसहभागातून सामाजिक उपक्रम)

उमरखेड प्रतिनिधी -

जीवन हे संघर्ष आहे या संघर्षामध्ये अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा असून आज पण कित्येक कुटुंब या मूलभूत गरजांसाठी लढा देत आहेत अशातच त्यांना निसर्गाशीही दोन हात करावे लागत आहे सद्यस्थिती पडणारी कडाक्याची थंडीही मोठे संकट ठरत आहे  या संकटातून बचाव व्हावा या साठी त्यांना उबदार कपड्याची गरज आहे पण पोटाची खळगी भरणे हा यक्ष प्रश्न समोर असतांना या सारखे अतिरिक्त कपडे कुठून आणावेत असा प्रश्न अनेक गोर गरीब उपेक्षित लोकांच्या मनात उद्भवतो याचीच दखल घेऊन उमरखेड येथील इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्था, उमरखेड सामाजिक कार्यात नेहेमी अग्रेसर असणाऱ्या कमी कालावधी मध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या जिव्हाळा संस्थेने या संघर्षाला सामोरे जाण्यासाठी 6 डिसेंबर पासून थंडीत कुड कुडनाऱ्या  अतिशय गरजवंत लोकांना “जिव्हाळा मायेची ऊब” ( लोकसहभागातून सामाजिक उपक्रम ) या अनोख्या उपक्रमा द्वारे ब्लॅंकेट वाटप करत आहेत. आता पर्यंत 151 च्या वर ब्लॅंकेट वाटप केले आहे. रविवार रोजी उमरखेड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस  यांच्या हस्ते  उमरखेड येथील झोपडपट्टी भागातील  अत्यंत गोरगरीब मुलींना उपविभागीय कार्यालय समोर ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.  त्यावेळेस स्वप्निल कापडणीस यांनी जिव्हाळा संस्था व त्यातील स्वयंसेवक यांचे सामाजिक कार्य बघून कौतुक केले तसेच संस्थेने आता पर्यंत सर्वच क्षेत्रात केलेल्या उलेखनीय कार्याची दखल घेत वाहवा केली व त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.  यावेळेस उमरखेड तालुक्याचे नायब तहसीलदार सुधीर देशमुख, नायब तहसीलदार सुभाषराव पाईकराव, तलाठी दतात्रय दुर्केवार, तलाठी  पी. एस. ठाकरे, बिराजदार, पवने जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल मादावार स्वयंसेवक प्रशांत वान्नरे, धम्मदिप कांबळे, विजय बेद्रे  हे  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या