ढाणकी प्रतिनिधी
गांजेगाव येथील पैनगंगा नदी पात्रात एका 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने गांजेगाव व ढाणकी परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गांजेगाव येथील पैनगंगा नदी मध्ये ब्राह्मणगाव येथील मारोती विठ्ठल शिरलू वय अंदाजे 35 वर्ष यांचा मृतदेह दिनांक 27 डिसेंबर रोजी तरंगताना आढळला. मारोती हा थोडा वेडसर वृत्तीचा असून दिनांक 25 डिसेंबर रोजी तो घरातून निघून गेला होता. याबाबत मयत मारोती चे काका प्रकाश शिरलू यांनी उमरखेड पोलीस स्टेशनं ला रिपोर्ट दिला होता.
याबाबत पोलीस स्टेशनं बिटरगाव येथे कलम 174 सी आर पी सी नुसार अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रामकिसन जायभाये, निलेश भालेराव, हाके, सतिष चव्हाण करत आहेत.

0 टिप्पण्या