उमरखेड प्रतिनिधी -
सेवानिवृत्त वन अधिकाऱ्याचे निवृत्ती वेतनाचे चार महिन्याचे थकीत वेतन काढून देण्यासाठी उमरखेड उपकोषागार अधिकारी अंबादास मेसरे यांच्या सोबत बिटारगाव वन परिक्षेत्र मधील वनरक्षक गोविंद फुलवरे यास यवतमाळ येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी ट्रेझरी कार्यालय परिसरात अटक केली.
बिटरगाव वनपरीक्षेत्र अधिकारी गोरे हे दोन महिन्या पूर्वी सेवा निवृत्त झाले. त्यांचे सेवा निवृत्ती पूर्वीचे चार महिन्याचे वेतन थकीत होते सदर वेतनाचे देयक कार्यालयाने उपकोषागार कार्यालयात सादर केले होते मात्र देयक मंजुरी साठी उपकोषागार अधिकारी मेसरे यांनी गोरे यांना सात हजाराची मागणी केली होती. तडजोडी अंती सहा हजारावर ठरले होते.
याबाबत सेवानिवृत्त आर एफ ओ गोरे यांनी लाच लुचपत विभागात तक्रार देऊन ए सि बी ने ट्रेझरी ऑफिस परिसरात सापळा रचला होता. वनरक्षक फुलवरे मार्फत लाच स्वीकारताना मेसरे यांना अटक केली. याबाबत उशिरा पर्यंत गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र क्षीरसागर, ज्ञानेश्वर शेंडे, शिपाई अनील राजकुमार, वसीम शेख, राजेश सावसकडे, महेश वाकोडे, सचिन भोयर, राहुल मेश्राम, चालक संजय कांबळे यांचा समावेश होता.

0 टिप्पण्या