सहस्त्रकुंड येथे वाहून गेलेल्या महिलेचे प्रेत मिळाले.



ढाणकी प्रतिनिधी 

यवतमाळ येथून सहस्त्रकुंड येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील महिला शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी पाण्याची पातळी वाढल्याने धबधब्यात वाहून गेली होती.  वाहून गेलेल्या महिलेचे आज मृतदेह परोटी जवळ मिळाला असून तेथेच शवविच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यात आले. 

सविस्तर वृत्त असे कि,  पंजाब न्याशनल बँकेत लिपिक पदावर कार्यरत असलेले संतोष कुमार आपल्या पत्नी ममता कुमार व दोन मुली सह सहस्त्रकुंड येथे आले होते.  मात्र नदी पात्रात मुरली बंधाऱ्याचे पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढून ममता कुमार त्या पाण्याच्या लोंढ्या त वाहून गेल्या तर मुलींना वाचवण्यात यश आले होते.  ममता कुमार यांचा मृतदेह 3 दिवसानंतर आज परोटी जवळ आढळला. व मृतदेहाची ओळख पटली.  महिलेच्या कुटुंबियांना बोलावून अंत्यविधी करण्यात आला. सदर घटनेची नोंद बिटरगाव पोलीस स्टेशनं मध्ये केली गेली असून पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या