वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगाव बुद्रुक येथील आठ विद्यार्थी चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

बिटरगाव बुद्रुक प्रतिनिधी कमलाकर  दुलेवाड 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत 16 फेब्रुवारी २०२०ला घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती  पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक परीक्षा परीक्षा इयत्ता आठवीचा फेब्रुवारी 2020 चा अंतरिम निकाल संकेतस्थळावर शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला यामध्ये वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगाव बुद्रुक येथील पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवीचे विद्यार्थी  शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण आठ विद्यार्थी यांनी यश संपादन केले यामध्ये चैतन्य माधव गावडे,कुमारी अनुष्का शंकर कदम ,कुमारी अंजली विलास काईतवाड , अजिंक्य धोंडीबा सूर्यवंशी,कुमारी प्रगती राजकुमार कोठेकर, सुजल गणपतराव पुजलवाड, आकाश साईनाथ गोपुवाड, शंभूराज बालाजी हेंद्रे, हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत .या यशाबद्दल अहिल्यादेवी होळकर स्मारक संस्था द्वारा संचालित संस्थेचे सचिव ॲड. दिलीप एडतकर व विद्यालयाचे व्यवस्थापक पुंजाराम डोंगे यांनी या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या तसेच विद्यालयाचे प्राचार्य ए.आर.राऊत उपप्राचार्य जे.एम.पाचकोरे,पर्यवेक्षक जी.एम. शिंदे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे वर्गशिक्षक ए.डी.गावंडे ,के.एम.दुलेवाड, एस.एन.सुबलकवाड  यांना सुद्धा शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले यावेळी या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय वर्ग शिक्षक प्राचार्य व एकलव्य कोचिंग क्लासेसचे शिक्षक शिवाजी माने यांना दिले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या