ढाणकी प्रतिनिधी -
सामाजिक कार्याचा वसा लाभलेले मेट येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विक्रम राठोड यांचा बंजारा सेने तर्फे कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
मेट तसेच आसपासच्या गावातील युवकांच्या गळ्यातला ताईत असलेले विक्रम राठोड हे नेहमीच सामाजिक कार्यात समोर असतात. गावातले लोक सुद्धा आपल्या समस्या घेऊन विक्रम राठोड कडे येत असतात तेव्हा जमेल तशी ते लोकांना मदत करतात असे गावातील लोक सांगत होते. गावातील 90 कुटुंबाना त्यांनी मयंक कन्ट्रक्शन च्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला.
कोविड सारख्या कठीण काळात सुद्धा त्यांनी आपले सामाजिक कार्य चालू ठेवले होते व आपल्या जिवाची पर्वा न करता लॉक डाऊन काळात कोरंटाईन करण्यासाठी बाहेर गावावरून आलेल्या लोकांसाठी राहण्याची व खाण्या पिण्याची व्यवस्था केली. व सतर्क राहून कोविड पासून गावाचे रक्षण केले. प्रत्येक घरी जाऊन त्यांनी मास्क व सेनेटायजर वाटले व लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. विक्रम राठोड यांचे मित्र मंडळ मोठे असून जीवाला जीव देणारे मित्र असल्यामुळे मी सामाजिक कार्य करत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत बंजारा सेने तर्फे त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले असून या मुळे मेट या गावात आनंदाचे वातावरण आहे.

0 टिप्पण्या