बिटरगाव प्रतिनिधी -कमलाकर दुलेवाड
यावर्षी निसर्गाचा पूर्णपणे समतोल बिघडला असून एका मागून एक संकट शेतकऱ्यांवर येतच आहेत. मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्याच्या हाती आलेला घास हिरावून गेला आहे, अशातच शासनाने निकष लावून पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाकडून केल्या जात आहे या शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला न्याय देण्यासाठी आमदार ससाने साहेब यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज सोमवार रोजी बिटरगाव, मतखंडातील सावळेश्वर या गावातील शेतशिवाराची पाहणी करून झालेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत महसूल व कृषी विभागाला निर्देश दिले यावेळी तहसीलदार देऊळगावकर, तालुकाध्यक्ष सुदर्शन रावते पाटील ,संजय देशमुख,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुभाष पुलाते ,बिटरगावचे सरपंच प्रकाश पेंदे, पंजाब देवकते, विलास चव्हाण,रमेश रावते, डॉ.जगदीश रावते,विनोद मामीडवार ,आनंदा हरणे,धनंजय शिरगिरे,मंडळ अधिकारी सचिन फटाले ,कृषी विभागाचे कर्मचारी व समस्त कास्तकार उपस्थित होते.

0 टिप्पण्या