निवडणुकीत दिलेला शब्द पाळत विक्रम राठोड यांनी केली विकास कामाला सुरवात.

 


ढाणकी प्रतिनिधी 

ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेला शब्द पाळत विक्रम राठोड यांनी विकास कामाला सुरवात केली आहे. मेट येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत विक्रम राठोड यांच्या पॅनल ला घवघवीत यश मिळाले.  त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात सांगितल्या प्रमाणे ग्रामविकासाला सुरवात केली असून नवीन पाणीपुरवठा पाईप लाईन चे काम सुरु केले आहे. 

मेट येथे मा.श्री उत्तमराव मोहनसिंग राठोड माजी सैनिक तथा माजी जिल्हा प रिषद सदस्य यवतमाळ व श्री. विक्रमभाऊ उत्तमराव राठोड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यवतमाळ यांच्या प्रयत्नाने व सतत पाठपुराव्यामुळे नवीन पाईप लाईन मंजूर करवून घेतली. यावेळी मा.श्री.उत्तमराव मोहनसिंग राठोड व नवनिर्वाचित सदस्य तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित लोकांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेतून नवीन पाईप लाईन चे उद्घाटन करण्यात आले.

     दरवर्षी उन्हाळा चालु होताच प्रत्येक गावाला भीषण पाणी टंचाई जाणवते,  यावर्षी सुद्धा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सदर पाईप लाईन चे काम चालु करण्यात आले आहे. यावेळी मा.श्री. उत्तमराव राठोड माजी सैनिक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ , मा.श्री.प्रेमसिंग मंगलसिंग नाईक अध्यक्ष तंटामुक्त मेट,  श्री.राम कनिराम राठोड माजी पंचायत समिती सदस्य उमरखेड, श्री. नामदेव रोडा आडे,श्री. प्रकाश फकीरा चव्हाण, श्री.गणेश मंगल चव्हाण,श्री.देवराव रोडा राठोड, श्री. गजानन शेषराव चव्हाण, श्री.गणेश वसराम राठोड, श्री. गणेश जाधव व नवनिर्वाचित ग्राम पंचायत मेट चे सर्व सदस्य तसेच गावातील समस्थ गावकरी मंडळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या