ढाणकी प्रतिनिधी -
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्हाचे पालकमंत्री ना संजय राठोड यांची सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी जी नाहक बदनामी विरोधी पक्ष करत आहे ती त्वरित थांबवावी अशी मागणी ढाणकी नगरपंचायत चे उपनगर अध्यक्ष तथा गटनेते जहीरभाई यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या पूजा चव्हाण या युवती च्या आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला होता. त्या सोबतच काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने हे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या मुळे ना. संजय राठोड यांची मोठी बदनामी होत या प्रकरणी राठोड यांनी पक्षश्रेष्टी कडे राजीनामा सुद्धा दिला आहे. हे सर्व विरोधी पक्षाचे षडयंत्र असून या मुळे ही बदनामी त्वरित थांबवावी अशा आशयाचे निवेदन जहीर भाई यांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना दिले.
यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक शेख इरफान, नगरसेवक, संबोधी गायकवाड, नगरसेविका ज्योती ओमराव चंद्रे उपस्थित होते.

0 टिप्पण्या