ढाणकीत मुख्याधिकारी यांचे कोठे आहे लक्ष. आठवडी बाजारात नागरिक फिरतात मास्क विना. तरीही साहेब करीत आहेत दुर्लक्ष.



ढाणकी प्रतिनिधी -

कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासनाने सावध भूमिका घेत कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी काही नियम जारी केले,  त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क किंवा रुमाल वापरने बंधनकारक असताना ढाणकी येथे आठवडी बाजारात नागरिक मास्क विना फिरताना दिसत असून नगरपंचायत प्रशासन कोणती ही कारवाई करत नसल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत मुख्याधिकारी साहेबांचे शहराकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा असून उद्या जर कोरोना रुग्ण वाढले तर जबाबदारी कोणाची  असा सुद्धा प्रश्न सुजान नागरिक करत आहेत.  तसेच बऱ्याच दुकानात दुकानदार सुद्धा मास्क वापरत नसल्याने नागरिक कोरोनाला हलक्यात घेत असल्याचे बोलले जात असून नगरपंचायत ने कारवाई सुरु केल्यास भीती पोटी तरी नागरिक मास्क वापरतील असे नागरिकांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या