अपंगाचा निधी साठी मनसेचा ढाणकी नगरपंचायत वर हल्ला बोल. ( मनसेच्या आंदोलनाला यश )

 


   ढाणकी : - अपंगाचा पाच टक्के निधी त्वरित वाटप करण्यात यावा  यासह विविध मागण्या संदर्भात आज  दि. 22 रोजी  मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने  नगरपंचायत वर धडक देत  मुख्याधिकारी  यांना मागण्यासंदर्भात त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. यासंदर्भात मुख्याधिकारी यांनी  एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अपंगाचा निधी वाटप व उर्वरित दहा मागण्यांचा पाठपुरावा करून कारवाई त्वरित करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे मनसेच्या आजच्या आंदोलनाला यश मिळाले असून अपंगांचा व इतर समस्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

 मनसेच्या वतीने आज 22 तारखेला नगरपंचायत वर विविध मागण्यांसंदर्भात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळत मोर्चाचे रूपांतर शिष्टमंडळात करून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष देविदास शहाणे व तालुकाध्यक्ष सादिक शेख यांच्या नेतृत्वात नगरपंचायत वर धडक दिली.

 ढाणकी शहरातील नागरिकांना करोना काळातील कर माफ करण्यात यावा, घनकचरा उचलने व नाली सफाई करण्यात यावी, पैनगंगा नदीवरील पाईप लाईन चालू करून पाणीटंचाई संदर्भात उपाय योजना करण्यात यावी, नगरपंचायत चे पाणी फिल्टर त्वरित सुरू करावे, वाढीव क्षेत्रात सुख सुविधा निर्माण कराव्या, मुख्य अधिकाऱ्यांनी मुख्याधिकार्‍यांनी मुख्यालयी हजर राहावे, आरोग्य केंद्रांना नगरपंचायत मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे, शहरात सुलभ स्वच्छालय बांधण्यात यावे , नगरपंचायत निर्माण होण्या अगोदर मान्य केलेल्या घरकुलांचे सर्वे कायम करण्यात यावी, शहरात रोजगार हमीचे कामे त्वरित चालू करावे या मागण्या संदर्भात मनसेच्या वतीने दोन फेब्रुवारीला मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आज सदर आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांनी अपंगाचा निधी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाटप करण्यात येईल तसेच इतर मागण्या संदर्भात पाठपुरावा करून त्वरित कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्‍वासन दिले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत जमलेल्या अपंगा समोर येऊन त्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आजच्या मनसेच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले असून इतर समस्या मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या वेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष देविदास शहाणे, तालुकाध्यक्ष सादिक शेख, मुकुंद जोशी ,हिरासिंग चव्हाण, सिद्धार्थ घुगरे , निसार पठाण ,मुन्ना रहमान ,सै सत्तार  , सलमान सह अनेक कार्यकर्ते व अपंग संघटनेचे अध्यक्ष श्यामा शिराळे , मुज्जुभाई , गोविंद सल्लेवाड सह बंधु भगीनी उपस्थित होते.



अपंगाचा निधीसाठी खळखट्याक आंदोलन - सादीक शेख तालुकाध्यक्ष

आजच्या आंदोलनाने अपंगाचा निधी एप्रील च्या पहिल्या आठवडयात देण्याचे मान्य केले तो ते वाटप करतील परंतु त्यांनी तो वाटप न केल्यास अपंगासाठी एप्रील महीण्यात परत खळखट्याक आंदोलन करण्यात येईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या