चिखली वन येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा मनमानी कारभार. (ग्रामस्थाची तहसिलदाराकडे तक्रार)



प्रतिनिधी:-मारोती गव्हाळे 
मो - 90493 05093
            उमरखेड तालुक्या अंतर्गत येत असलेल्या चिखली वन येथील स्वस्त धान्य दुकानदाराने धान्य वाटपात प्रचंड प्रमाणात अनियमितता केली आहे. राशन धारकाकडून स्वस्त धान्यची सरकारी दरापेक्षा जादा भावाने पैसे वसुली करून घेत असतो. पावती न देता काही मालाची प्रचंड दराने पैसे वसूल करीत असतो. कोणाला २०  तर कोणाला १५ तर कोणाला १०  या दराने  वाटप करीत असतो.म्हणजे मंजूर धान्यापेक्ष्या पाच ते दहा किलो माल कमी देत असतो. या गंभीर प्रकाराची तक्रार  तुकाराम ग्यानबा शेळके सह इतर १० ग्रामस्थांनी उमरखेड तहसिलदार यांच्याकडे केली आहे.
           शासनाचे गोरगरीब नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळावे म्हणुन प्रत्येक गावात स्वस्त धान्य दुकान निर्मिती केली आहे. त्या गावातील एका नागरिकाला स्वस्त धान्य विक्रीचा परवाना देऊन नागरिकांना धान्य उपलब्ध करून दिले आहे.परंतु बहुतांश गावातील स्वस्त धान्य दुकानदार हे दुकान  आपल्या मालकीचे असल्याच्या अविर्भावात राहत आहेत. त्यामुळे  गावातील अनेक नागरिकांना हक्काच्या अन्नधान्य पासुन वंचित राहत आहेत.   
        चिखली वन येथे भिमराव पोमा पवार यांचे सरकारी स्वस्त धान्य दुकान आहे.पवार हे नेहमीच स्वस्त धान्य घेणाऱ्या काही लाभार्थ्याना माल कमी व ज्यादा दराने देत असतात. दुकान महिनाभर चालु ठेवण्याचा नियम असतांना सुद्धा माहिण्यातील काही दिवसच दुकान चालु ठेवतात. दुकानामध्ये एपीएल, बिपीएल, शेतकरी लाभार्थी कार्ड धारक किती यांची यादी दर्शनी भागात लावत नाहीत. प्रत्येक माहिण्यात माल किती आला याची माहीती दिली जात नाही तर दुकानात तक्रार वही सुद्धा ठेवलेली नाही. 
           या वर्षी देशात कोराणा सारख्या माहामारीने संकट ओढावले आहे. संपुर्ण देश लॉकडाऊन आहे . गोरगरीब नागरिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्यान योजने अंतर्गत राशनकार्ड धारकांना प्रती व्यक्ती मोफत ५ कि. धान्य दिले आहे. मात्र येथील स्वस्त धान्य दुकानदारा कडुन प्रतिव्यक्ती माल न देता कमी माल वाटप केला आहे. त्यामुळे सदर स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी एका निवेदनाव्दारे चिखली वन येथील वंचित कार्डधारकाकडुन
करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या