यवतमाळ चे भाई अमान यांचा प्रशासनाने सन्मान करावा. ढाणकी येथील कोविड रुग्णाने केली जिल्हाधिकारी यांना मागनी.


ढाणकी प्रतिनिधी 
कोविड 19 म्हणजे कोरोना मुळे  सद्या सगळी कडे भीतीचे वातावरण आहे. चीन मधून तयार झालेल्या व्हायरस ने आज भारतात सुद्धा आपले हातपाय पसरले आहे.  या विषाणूला आळा घालण्या साठी शासनाने संपूर्ण भारतात लोकडाऊन घोषित केला होता.  त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली,  श्रीमंत लोकांना लॉक डाऊन मुळे काही फरक पडला नाही.  मात्र ज्यांचे हातावर पोट आहे अश्या लोकांची खुप दैना झाली,  एका वेळच्या जेवणाचे सुद्धा वांदे झाले.  तेव्हा अश्या लोकांच्या मदतीला यवतमाळ स्थित भाई अमान धावून आले.  त्यांनी किराणा,  धान्य वाटले,  रोज वेगवेगळ्या रुग्णालयात जाऊन जेवणाचे डब्बे दिले.  त्यामुळे त्यांचे नाव आज प्रत्येक व्यक्तींच्या तोंडात आहे. 
नुकतेच ढाणकी येथील एका कोविड रुग्णाने जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना पत्र लिहून कळविले कि,  जेव्हा ते यवतमाळ येथील कोविड  सेंटर ला कोरोनावर उपचार घेत होते तेव्हा कोविड सेंटर ला भाई अमान यांचा उत्कृष्ट  जेवणाचा डब्बा दोन वेळेस येत होता व तो प्रत्येक रुग्णाला जात पात न पाहता दिल्या जात होता.  रुग्ण भाई अमान यांच्या डब्याची आतुरतेने वाट पाहायचे.  तेव्हा अश्या अन्नदाता व्यक्तीला शासनाने योग्य ती दखल घेऊन सन्मान करावा अशी मागणी त्या व्यक्तीने पात्रातून व्यक्त केली. 
आजच्या या काळात व्यक्ती फक्त स्वतःसाठी जगताना आपण पाहतो. अश्या काळात भाई अमान निःस्वार्थ पणे रुग्ण सेवा तसेच जनसेवा स्वखर्चाने करत आहेत. स्वस्थ होऊन आलेल्या अनेक रुग्णाने अमान भाई यांच्या कार्याची स्तुती केली आहे.  कोणताही अडला नडला व्यक्ती त्यांच्या कडे मदतीला गेल्या नंतर ते कधीच नाही म्हणत नाही अशी त्यांची ख्याती असून रुग्ण तसेच गरीब व्यक्तीला ते जमेल तशी मदत करत असतात.  तेव्हा अमान भाई यांच्या कार्याची प्रशासनाने दखल घेऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा अशी मागणी रुग्ण तसेच नागरिक प्रशासनाला करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या