शेतकऱ्यांची पिकांचे पंचनामे करण्याची मागणी.
ढाणकी प्रतिनिधी;
या वर्षी निसर्गाचा प्रकोप संपता संपत नाही आहे. वेगवेगळ्या नैसर्गिक संकटा मुळे सगळीकडे हाहाकार माजला असून या मध्ये बळीराजा सुद्धा चेपला जात आहे.
सावळेश्वर ढाणकी परिसरात सद्या सोयाबीन वर पिवळ्या व्हायरस ने आक्रमण केले असून शेतकऱ्यांना च्या तोंडाचा घास जाते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बाबत कृषी विभागा कडे परिसरातील शेतकऱ्यांनी वारंवार अर्ज, निवेदन दिल्या नंतर 2 सप्टेंबर रोजी कृषी विभागाचे अधिकारी पिकांची पाहणी करण्यासाठी आले मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचे पंचनामे केले नाही. पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश नसल्याचे सांगण्यात आले. या मुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट असून लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना मंडळ कृषी अधिकारी नीबळकर साहेब यांनी उमरखेड तालुक्यात आलेल्या सोयाबीन पिवळे पडण्याच्या समस्येबद्दल शेतकऱ्यांना अवगत करून वेळीच काळजी घेण्याचे आव्हान केले.हा नवीनच रोग असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेतकऱ्यांनी फवारणी मध्ये टिब्युकॉनाझोल १०% सल्फर ६५ टक्के(हारू)या संयुक्त बुरशीनाशकाची फवारणी २५ ग्रॅम प्रती १०लिटर पाण्यात वापर करावा असे सांगितले.या बुरशीनाशकाने या पुढील काळात येणाऱ्या सोयाबीन वरील शेंग करपा या रोगाची वेळीच अटकाव होईल असेही त्याने सांगितले. पुढें कापूस पिकात आलेल्या बोंड आळी संदर्भात मार्गदर्शन करताना शेतात कामगंध सापळे लावण्याचे सांगितले.कापूस बोंड आळी एकात्मिक व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे.याला अटकाव करण्यासाठी पिक फेरपालट असून बियाण्यास कीटकनाशक का सोबत बीजप्रक्रिया करावी असे सांगितले.सोयाबीन पीक ५० ते ७५ दिवसांचे असताना तसेच फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना अती पावसात व सतत धार पावसामुळे या पिकावर जास्त प्रमाणात रोग वाढल्याचे दिसून आले.सोयाबीन या पिकाचा विमा काढलेल्या शेतकरी बांधवांनी नुकसान झाले असल्यास पिक विमा कंपनीस क्रॉप इन्शुरन्स मोबाईल द्वारे एप्लीकेशन किंवा पिक विमा कंपनी टोल फ्री क्रमांक वर लगेच माहिती द्यावी.असे आवाहन करण्यात आले.

0 टिप्पण्या