ढाणकी शिवसेना प्रमुख पदी विजय उर्फ बंटी जाधव.

 

ढाणकी प्रतिनिधी 

ढाणकी शिवसेनेच्या प्रमुख पदी बंटी जाधव यांची नियुक्ती जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी केल्याने ढाणकी शिवसेने मध्ये उत्साहाचे वातावरण आहे.  

सध्या जिल्हा भर शिवसेनेच्या वतीने आढावा बैठकी चालू असून आगामी निवडणुकीसाठी शिवसैनिकां मध्ये उत्साह भरण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ भवन येथे ही बैठक आज पार पडली  यावेळी तालुक्यातील सर्व जेष्ठ शिवसैनिक,  पदाधिकारी उपस्थित होते. ढाणकी शहरातील राहिलेल्या नियुक्त्या सुद्धा यावेळी करण्यात आल्या असून,  कोअर कमिटी ची स्थापना सुद्धा यावेळी करण्यात आली. ढाणकी  येथे शिवसैनिकांनी फटाके फोडून बंटी जाधव यांच्या निवडीचे स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या