*
प्रतिनिधी:- सावळेश्वर.
आज-काल मोबाईल अत्यावश्यक सेवा मध्ये गणल्या जात असून बहुतांशी व्यवहार मोबाईल द्वारे होत आहेत. कोरणा या संसर्गजन्य आजारामुळे शाळा कॉलेज बंद आहेत. तरी शिक्षण प्रणाली ऑनलाईन मोबाईल द्वारे सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यासाठी इंटरनेट मोबाईल सेवा अत्यंत गरजेचे झाले आहे. गाव खेड्यातील शेतकर्याची परिस्थिती नसताना आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिला पण मागील दोन महिन्यापासून नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थी आपल्या ऑनलाईन क्लास अभ्यासक्रमापासून वंचित राहत आहे.
कॉल ड्रॉप, कॉल डिस्कनेक्ट, मंदावलेल्या नेटवर्कमुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिओ नेटवर्क कंपनी 4g नेटवर्क नावाखाली 2जी सेवा देत आहे परिणामी विद्यार्थी व पालक वर्गाच्या हिरमोड होत आहे.
सावळेश्वर येथे फार मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग असून या भागातील सर्व शेतीवर आधारित आहे. मागील महिन्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतीच्या पिकाची अतोनात नुकसान झाले आहे. ईसापुर धरणातील विसर्गा मुळे पैनगंगा नदी आपल्या शेजारील पिके आपल्या कवेत घेऊन वाहत असल्यामुळे नदी शेजारील शेतकऱ्यांचे पीक गेले आहे. काढणीपूर्व पिक शेतकऱ्यांच्या हातचे गेल्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला आहे. प्रधानमंत्री पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना झालेल्या पिकाच्या नुकसानीचे 72तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन मोबाईल द्वारे पिकाची अर्ज भरा म्हणत आहे आणि सावळेश्वर येथे जियो नेटवर्क सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या गावावरून शहराच्या ठिकाणी जाऊन आपले अर्ज भरावे लागत आहे.
फोर जी चे रिचार्ज आणि टूजी सेवा देत आहे. एका महिन्याचे रिचार्ज दोनशे रुपये तरीपण ग्राहकांना रिलायन्स 4g सेवा देत नाही. जिओ सुविधा उत्तम असल्याचे कंपनी सांगून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपले नेटवर्क जले वाढवले आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्याची त्यांनी सांगितले. पण मागील दोन महिन्यापासून नेटवर्क विषयी विचारणा केली असता उद्या किंवा परवा नेटवर्क सुरू करू असे आश्वासन कर्मचारी देत आहेत. तर काही ग्राहकांनी रिलायन्स जिओ सिम पोर्तबिलिटी करून ुसर्या कंपनीत कन्वर्ट करत आहेत रिलायन्स जिओ कंपनीने नेटवर्क अडचण दूर करून परिसरातील सेवा सुरळीत करून देण्यात यावे अशी मागणी पालक व शेतकरी वर्ग करत आहे.

0 टिप्पण्या