ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी येथील बालाजी हार्डवेअर मध्ये दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या चोरीतील आरोपीना बिटारगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कडून दोन मोटारपंप अंदाजे किंमत 11000 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला असून फिर्यादी दुकान मालकास आज परत करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, बालाजी हार्डवेअर मध्ये 26 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता आरोपी नामे कार्तिक संतोष पोहरकर, अर्जुन गणेश गायकवाड, करण गणेश गायकवाड रा विडूळ यांनी सदर दुकानातून 11000 हजार किमतीच्या 2 मोटारपंप चोरून नेले होते. घटना लक्षात येताच याची लेखी तक्रार दुकान मालक सुभाष जन्नावार यांनी बिटारगाव पोलिसात दिली होती. घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रामकिसन जायभाये, पोना रवी गिते, सतीश चव्हाण, निलेश भालेराव यांनी तपासाची चक्रे फिरवीत आरोपीना अटक केली. व त्यांच्यावर भां द वि कलम 461, 380 नुसार गुन्हा नोंद केला.

0 टिप्पण्या