[तालुका कृषी कार्यालयात राडा:अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी]
उमरखेड:प्रतिनिधी
तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास वेळ होत असल्याचा निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी यांच्या टेबलावर सोयाबीन पिकांची सडलेली, कोम आलेली पिके टाकण्यात आली. उमरखेड तालुक्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली आहे.तालुक्यातील सर्व भागातील नदी-नाले लहान मोठे जलाशय व सिंचन प्रकल्प काही प्रमाणात भरली असून त्यांनी प्रवाहाचा वेग धरला आहे. कमी-जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. पिके पिवळी पडली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जास्त पावसामुळे मुख्य पीक असलेले सोयाबीन कापूस मुंग हाताशी गेली आहे. नुकताच झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले असून खरीप पिके पिवळी,काळि पडलेली आहे .सोयाबीन पिकांच्या शेंगा झाडावरच सडायला लागत आहे.शेतीतील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रहार जनशक्ती पक्षाने तालुका कृषी अधिकारी यांना निवेदना मार्फत केली. यावेळी पक्षाची तालुका अध्यक्ष सय्यद माजित, राहुल मोहितवार, अंकुश पानपट्टे,सय्यद अझर,सावन हिंगमिरे, विवेक जळके, समाधान लष्कर,अख्थर ,मुंडे आधी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
____________चौकट___________
*पंचनाम्याचे आदेश आले नाही-तालुका कृषी अधिकारी*
निवेदन देण्यासाठी कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते गेले असता त्याठिकाणी गैरहजर असणारे कृषी अधिकारी यांना फोन द्वारे कार्यकर्त्यांनी पंचनामे अजून पर्यंत का झाले नाही असे विचारले असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश आले नसल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी फोन द्वारे सांगितले.

0 टिप्पण्या