आगीत भस्मसात झालेल्या घराच्या कुटुंबाला जिव्हाळा स्वंस्थेची


(करीम खान दुले खान यांच्या पीडित कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूची मदत) 

उमरखेड प्रतिनिधी 
 :-  संपूर्ण जगात कोरोना  या आजाराने थैमान घातले असून, सर्व जग या विष्णूच्या आजारामध्ये होरपळत आहे त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या मुळावा या गावातील अतिशय गरीब मुस्लीम कुटुंबाला जिव्हाळा संस्था एक वरदान ठरली आहे. येथील मुस्लीम कुटुंबाचे करीम खान दुले खान व हम्मू बी करीम खान यांचे संपूर्ण घर जळून भस्मसात झाले असून ,त्यांचा संसार अक्षरशः उघडल्यावर आलेला आहे. या पीडित कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यांची फार मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली. असून जीवित हानी थोडक्यात टळली आहे.  त्यामध्येच त्या झालेल्या पीडित कुटुंबाची नुकसानीची माहिती कानी पडतातच इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्था  अवतरली आहे. जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अतुल मादावार  यांनी एक हात मदतीचा या पार्श्वभूमीवर, सदर कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्य राशन व किराणामाल देऊन कौतुकास्पद कार्य केले आहे. ते कार्य केल्याने संपूर्ण गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व त्या कुटुंबांना आर्थिक नुकसान भरपाई जास्तीत जास्त कशी होईल ही पावले उचलले आहेत. त्यावेळी तंटा मुक्ती अध्यक्ष शेख शब्बीर, जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अतुल मादावार, पत्रकार शेख नयुम, गफ्फार बागवान, महेफुज देशमुख,शेख फैजान, जिव्हाळा संस्थे चे स्वयंसेवक सय्यद अतिक व विजय बेद्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या