ढाणकी प्रतिनिधी
या वर्षी कोरोना विषाणू मुळे सर्वत्र भीती चे वातावरण आहे. त्यामुळे शासनाच्या निर्दशना नुसार व शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच गणेश उत्सव साजरा करायचा असा आदेश होता. त्या आदेशाचे पालन करत ढाणकी शहरातील नावाजलेले गणेश मंडळ म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदवी स्वराज् गणेश मंडळ दरवर्षी काहीकाहींना श्रद्धाजागरणा चे व राष्ट्रजागरणाचे कार्यक्रम, उपक्रम घेत घेतले.
हीच परंपरा कायम ठेवत व सामाजिक ऋण फेडण्याचा उद्देशाने, कोरोना काळात सामाजिक योगदान म्हणून दिनांक, 30/08/2020 ला रविवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते, कोरोना या महामारीत रक्तदान हे सामाजिक आयाम आहे, व त्यापासून सामाजिक लाभ होईल असा पवित्र हेतू मनात ठेवून, कोणताही गाजावाजा न करता हा उपक्रम घेण्यात आला,या कार्यक्रमाला रा स्व संघाचे मा आनंदराव चंद्रे ,नगराध्यक्ष सुरेशजी जयस्वाल, यांचे हसते उदघाटन झाले, जवळपास 86 रक्ताचे युनिट श्री गोळवलकर गुरुजी रक्तपेढी नांदेड यांना प्रदान करण्यात आले, या कार्यक्रमासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक श्री उमेश योगेवार ,सुमित मुखींरवाड उमेश विभूते, साई मंतेवाड ,पंकज केशेवाड, दिगंबर बल्लेवार,व. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली


0 टिप्पण्या