सोयाबीन चे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या.



सावळेश्वर येथील शेतकऱ्यांचे  तहसीलदार / कृषी अधिकारी यांना  निवेदन 

सावळेश्वर प्रतिनिधी 
या वर्षी कोरोना विषाणू मुळे हाहाकार माजला असताना त्यात अजून पावसाने सुद्धा भर टाकली आहे.  या वर्षी जास्त पाऊस झाल्याने ढाणकी परिसर तसेच सावळेश्वर परिसरात सोयाबीनचे पिके पिवळी पडली आहे. 
मूर्ग नक्षत्रात दमदार पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी पेरणी केली.परंतु बियाणे *वांझ* निघाले....उगवलेच नसल्याने शेतकऱ्यानं वर दुबार पेरणीचे संकट ओढवले.पुन्हा सोयाबीन पेरणी करावी लागली.कसे बसे हात उसने किंवा कर्ज घेऊन पेरणी केली पण या महिन्यात मागील दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे  अनेक पिके पाण्याखाली गेली.त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे.तर सावळेश्वर शेत शिवारात सोयाबीन या पिकावर एक नवीनच विषाणूजन्य पिवळा व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.हा रोग शेकडो एकर जमीन मध्ये सोयाबीन पिक पिवळे पडून (वांझ)मरून जात आहेत.त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.या रोगामुळे शेतकऱ्यांचे पट्टे ला पट्टे सोयाबीन पिक मरून गेल्या या मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.  या करिता सावळेश्वर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार उमरखेड तसेच तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले. व त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी धुरपताबाई कांबळे,  गणपत तुकाराम रावते,  मारोती गणपत रावते,  विवेक कल्याणराव रावते,  राजू बाबाराव रावते,  देवानंद रामराव रावते,  अनिल रमेश रावते,  सुदर्शन दत्तराव रावते,  माधव देविदास गरुड, इद्यादी शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या