तलाठी कार्यालयाचे बांधकाम अर्धवट. आंबट शौकिनांचा बनत आहे अड्डा.



ढाणकी प्रतिनिधी 
उमरखेड तालुक्यातील मोठे महसूल मंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ढाणकी च्या तलाठी कार्यालयाचे बांधकाम अर्धवट झाल्याने ते ठिकाण आंबट शौकीन लोकांसाठी अड्डा ठरत आहे.  
सद्या ढाणकी खंड 1 व दोन चे तलाठी कार्यालय हे नगरपंचायत च्या कॉम्प्लेक्स मध्ये असून स्वातंत्र्य इमारतीचे बांधकाम हे शासकीय गोदामा जवळ चालू आहे.  मात्र गेल्या 3 चार महिन्यापासून संबंधित ठेकेदाराचे बिल न निघाल्याने त्याने बांधकाम थांबवले आहे.  त्यामुळे त्या इमारतीत शहरातील दारुडे,  आंबट शौकीन आसरा घेत असून जागो जागी दारूच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडून आहेत.  ढाणकी शहरात एक पण सार्वजनिक मुतारी नसल्याने लोक त्या इमारतीचा उपयोग सौचालाय तसेच लघवी करण्यासाठी करत आहे.  
लाखो रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या इमारतीचे बांधकाम थांबल्याने तसेच त्या इमारतीचा असा उपयोग होत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण असून संबंधीत बांधकाम लवकरात लवकर चालू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.


सद्या रेतीचा तुटवडा असल्या कारणाने संबंधित कार्यालयाचे बांधकाम बंद आहे.  रेती चा पुरवठा सुरळीत चालू झाल्या नंतर बांधकाम चालू होईल तसेच काही बिल सुद्धा बाकी राहिले आहे. 

नतीम ठेकेदार 
ढाणकी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या