बिटरगाव प्रतिनिधी
कमलाकर दुलेवाड
पोलीस स्टेशन बिटरगाव चे ठाणेदार विजय चव्हाण यांचे कल्पनेमधून पोलीस स्टेशन बिटरगाव व समस्त बिटरगावकर यांचे संयुक्त विद्यमानाने गावामध्ये जातीय सलोखा कायम राहावा म्हणून स्वतंत्र दिनाचा औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरास गुरु गोविंद सिंग नांदेड येथील ब्लड बँक ची टीम आली होती. सदर रक्तदान शिबिरास पोलीस बांधव व बिटरगाव, मन्याळी, अकोली, भोजनगर, रतन नाईक नगर, ढाणकी, सावळेश्वर येथील तरुण मंडळीनी रक्तदान केले. सदर शिबीरास ऐकून 114 रक्तदात्यानी रक्तदान केले. सदर शिबिरास ठाणेदार विजय चव्हाण, पोउपनि रामकिसन जायेभाये, पोना रवी गिते, गजानन खरात, संदीप राठोड, सतिष चव्हाण व पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सरपंच प्रकाश पेदे, तंटा मुक्ती अध्यक्ष काशिनाथ पेंधे, सचिन साखरे, भीमेश सर, पोलीस पाटील नामदेव देवकते, माजी पोलीस पाटील कांबळे, धनराज शिरगिरे, बंडू देवकते, सुजित तूपेकर, बाळू हामद, अमित कांबळे, संदेश कांबळे, वसंता नरवाडे, विलास फुलारी, पिंटू देवकते, देवा देवकते, मस्तानभाई, गोस शेख, सतीश चिकणे, गजानन मिचेवर, विक्रांत विनकरे, विजय विनकरे, लक्ष्मण हाके, विनोद नाईक, संतोष गवळी व पत्रकार बांधव यांनी रक्तदान शिबीर पार पाडण्याकरिता मोलाचे सहकार्य केले.सदर रक्तदान हे सोशल डिस्टन्स पाळून पार पाडण्यात आले.

0 टिप्पण्या