प्रतिनिधी ः- कमलाकर दुलेवाड
देशा भरात महामार्गाचे जाळे विस्तारत असून बिटरगाव बु गावातील रस्ते अजूनही अनेक वर्षापासून आहेत तसेच आहेत. रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावरील दुचाकीसह चार चाकी वाहन धारकांना या रस्त्यावरून जाणे येणे म्हणजे जीवावरची शिकसत करावी लागत आहे. अनेक दुचाकीस्वार या रस्त्याने जाता येताना चिखलमय रस्त्यावरून पडून अपघात होत असून, यामध्ये अनेक जण जखमी झाले आहे. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात सध्या पावसाचे पाणी खड्ड्यात साचुन खड्डे आणखी मोठे झाले आहे. या गावातील मुख्य रस्त्यावर पायी ये-जा करणे सुद्धा मुश्किल झाले असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याच्या कामाला मंजुरी देऊन येथील अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी गावातील नागरिक करत आहे.

0 टिप्पण्या