ढाणकी न्युज नेटवर्क
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणू हात पाय पसरवत असून जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. महागाव तालुक्यातील साधुनगर येथील सराफा व्यावसायिकाचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला होता. सदर मृतकाच्या संपर्कात आलेले तेरा लोक आरोग्य यंत्रणेने कालच संस्थात्मक विलगीकरणा मध्ये दाखल केले आहेत. याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. मृतकाचे गाव कालच महसूल विभाग व आरोग्य विभागाने सील केले असून, कोण्या नागरिकाला काही लक्षणे आढळतात का या कडे प्रशासन लक्ष ठेऊन आहे.

0 टिप्पण्या