ढाणकी प्रतिनिधी
करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ढाणकी येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर लोकांची कमतरता असून सकाळ पासून रुग्णांना डॉक्टरांची वाट पाहत बसावे लागत आहे.
अंदाजे 30 हजार लोकसंख्या असलेल्या ढाणकी शहराचा रुग्णाचा भार एक डॉक्टर सांभाळत असल्याने रुग्णाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ढाणकी शहराला अनेक छोटे मोठे गावे जोडली असून तेथील रुग्ण सुद्धा ढाणकी येथेच तपासणी साठी येतात मात्र कर्तव्यावर असलेले एकमेव डॉक्टर च वारंवार आजारी पडत असल्याने लोकांनी कोणाकडे पाहायचे हो मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.आज सकाळी रुग्ण तपासणी करतानाच कर्तव्य वरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बेत बिघडली त्यामुळं रुग्णांना ताटकळत बसावे लागले.
आज कोरोना ने जगामध्ये धुमाकूळ घातला असून सर्व दवाखाने रुग्णांनी भरलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरी ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राला अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्याची सोय करून द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज अंदाजे 300 च्या जवळपास रुग्ण तपासणी होते. ही संख्या मोठी असून अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी असल्यास हा ताण कमी होईल.
रुग्ण कल्याण समितीचे माजी सदस्य अमोल तुपेकर, सामाजिक कार्यकर्ते संभाजी गोरंटकर यांनी दवाखान्याला भेट दिली असता हा प्रकार उघडीस आला असून त्यांनी या बाबत वरिष्ठांना माहिती दिली आहे.

0 टिप्पण्या