एक दिवस एक हात मदतीचा थोडंसं जगणं समाजासाठी. कर्तव्यदक्ष फाउंडेशन चा अभिनव उपक्रम.



ढाणकी प्रतिनिधी -
माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात वावरताना आपणही समाजासाठी काही कराव या उद्देशाने कर्तव्यदक्ष फाउंडेशन मार्फत थोडंसं जगणं समाजासाठी हा उपक्रम चालू केला. कर्तव्यदक्ष फाऊंडेशन महाराष्ट्रराज्य गेली 6 वर्षे पासून अनाथ आत्महत्या ग्रस्त दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यां च्या मुलांना  गरजुं  दिव्यांग  HIV ग्रस्त  मुलांना फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल तनपूरे पाटील  यांच्या मार्गदर्शन खाली हजारो मुलांना शैक्षणिक साहित्य व रोजगार सहकार्य मिळाले आहे
 नेहमीच समाजउपयोगी योजना राबऊन समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत असते. आज कोरोनाचे संकट साऱ्या जगावर धुमाकूळ घालत असताना जे लोक मजूर आहेत,  ज्यांचे हातावर पोट आहे,  जे हलाखीचे जीवन जगतात अश्या व्यक्तीनं साठी कर्तव्यदक्ष फाउंडेशन ने एक उपक्रम चालू केला असून प्रत्येक व्यक्तींनी समाजासाठी फक्त रोज एक रुपया द्यायचा आहे.  एक रुपया म्हणजे खुप लहान रक्कम आहे,  मात्र आपण सगळ्यांनी मिळून जर दिली तर एक व्यक्ती महिन्याला 30 रुपये देऊ शकतो,  हे आपले 30 रुपये अनेक दीनदुबळे,  लहान मुले,  अनाथ, अशा समाजातील व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलव शकतो. आपल्या एका रुपयाचे मदतीने उद्याच्या काळात डॉक्टर,  वकील,  इंजिनिअर बनू शकतो. ही संकल्पना अध्यक्ष अजिंक्य राठोड यांनी मांडली असून या उपक्रमाला रोहित वर्मा,  अमोल तुपेकर,  उदय पुंडे,  संजय जाधव,  कैलास चव्हाण,  सतीश जाधव,  चंद्रकांत कोलपूसे,  ज्ञानेश्वर ब्रम्हतेके,  दिपक जाधव,  डॉ चंदन पांडे,  कुणाल नाईक,  गजानन पांढरे,  कैलास राठोड,  रवी चव्हाण,,  नगरसेवक राजू राठोड,  शिवसेना तालुका प्रमुख संजय पळसकर,  सप्त खंजिरी वादक, पंकजपाल महाराज,  नितीन येरावार बाळू महाराज डाके,  प्रहार युवा तालुका प्रमुख धीरज आडे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण 
अजिंक्य राठोड 8999787532
विठ्ठल तनपुरे पाटील 8180844337
मोहन कळमकर 
7385861446 यांच्याशी संपर्क करू शकता असे आवाहन कर्तव्यदक्ष फाउंडेशन उमरखेड ने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या