मुंबई वरून येणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या विलगिकरणाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी : गटनेते संतोष पुरी


ढाणकीत येत आहेत मुंबईतून लोंढे

प्रतिनिधी / 4 मे
ढाणकी :  ढाणकी शहरात मुबंई, भिवंडी मानकुली येथून स्थलांतरित मजुरांचे लोंढे येत आहेत. स्थानिक प्रशासनाने त्यांची व्यवस्था शहरानजीकच्या शाळेत केली, मात्र तेथे आवश्यक ती खबरदारी, निर्जंतुकीकरण, आरोग्य सुविधा, मास्क, पी.पी.ई. किट अशा प्राथमिक सुविधा नसल्याने स्थानिक प्रशासनाला स्थलांतरीत मजुरांची व्यवस्था करने शक्य नसल्याने या मजुरांची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी अशी मागणी ढाणकी नगर पंचायतीचे भाजपचे गतनेते संतोष पुरी यांनी पत्रकार परिषदेत केली.
          कामासाठी मुंबईला वास्तव्यास असलेल्या मजुरांचे लोंढे च्या लोंढे ढाणकी शहरात वापस येत आहेत. सध्या 35 मजूर गावालगतच्या शाळेत विलगीकरणात आहेत तर अजून 50 पेक्षा अधिक जण गावात वापस येणार आहेत. महसूल प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासनाने त्यांची राहण्याची व्यवस्था गावानजीकच्या शाळेत करण्यात आली, मात्र त्या शाळेत निर्जंतुकीकरण, मास्क, पी. पी. ई. किट अशा कुठल्याच सुविधा नाहीत, त्यामुळे अनपेक्षितरीत्या येणाऱ्या लोंढ्यातील कुणास कोरोनाची बाधा झाली तर संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. विलगिकरणातील सर्वज। डिस्टन्स ह्या बाबी पाळतीलच असे नाही त्यामुळे संसर्गाची शक्यता नाकारता येणार नाही. निर्जंतुकीकरण, सॅनिटाइझर, मास्क आणि तत्सम उपाययोजनांसाठी नगर पंचायतीकडे निधी उपलब्ध नाही. ग्राम पंचायतीचा 14 व्या वित्त आयोगाचा निधी आखर्चित आहे, मात्र तो खर्च करण्याची परवानगी नाही, प्रशासकीय स्तरावर आणि नगर सेवकांनि आपल्या स्तरावर पाठपुरावा केला मात्र अजूनही जिल्हा प्रशासनाने रीतसर परवानगी दिलेली नसल्याने नगर पंचायत प्रशासन हतबल आहे. या पार्श्वभूमीवर ढाणकितील 25 हजार लोकांच्या आरोग्याशी खेळण्यापेक्षा जिल्हा प्रशासनाने स्थलांतरित मजुरांची विलगिकरनाची जबाबदारी घ्यावी किंवा नगर पंचायत प्रशासनाला ग्राम पंचायतीचा 14 व्या वित्त आयोगाचा आखर्चित निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती नगर पंचायतीचे भाजपाचे  गटनेते संतोष पुरी यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी पाणी पुरवठा सभापती संबोधी गायकवाड, नगरसेवक बाळू उर्फ उमेश योगेवार, रमेश पराते, शंकर ताटीकुंडलवार, नितीन ठाकूर, दिलीप नंदनवार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या