पत्रकारांना मानधन व विमा संरक्षण लागू करा.



प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ  (रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेची मुख्यमंत्री यांच्याकडे  मागणी 

यवतमाळ : अनिल राठोड 
 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ  (रजि )महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  पत्रकारांना मानधन व विमा संरक्षण लागू करावा अशी मागणी मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे व यवतमाळचे पालकमंत्री श्री संजयभाऊ राठोड  यांना ईमेलद्वारे करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार बाधंवाची परिस्थिती ही अत्यंत हालाखीची निर्माण झाली आहे. कोरोना या महामारीमुळे पत्रकारावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. वर्तमानपत्राच्या जाहिराती बंद असल्याने कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य  पत्रकारांना होत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  पत्रकार हा आपला जीव धोक्यात घालून कोरोनासंदर्भात वार्तांकन करत असून त्यांना कोणत्याही  प्रकारचे विमा कवच लागु नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य धोक्यात आहे अशा समयी शासनाने अद्यापपर्यंत पत्रकारांना कोणत्याही प्रकारचे मानधन आणि विमा संरक्षण लागू  केलेले नाही. पत्रकारसुद्धा कोरोना योद्धा आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोच त्यामुळे पत्रकारांना मानधन व विमा संरक्षण लागू करून पत्रकारांचे मनोधैर्य अधिक बळकट करावे अशी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ  विदर्भ अध्यक्ष विजय  कुमार बुंदेला जिल्हाध्यएक्स अनिल राठोड यांनी मा मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे व यवतमाळचे पालकमंत्री श्री संजयभाऊ राठोड यांना ईमेलद्वारे मागणी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या