*रमजान च्या पवित्र महिन्यात पक्ष्यांसाठी पाणीपोई



ढाणकी प्रतिनिधी 

ढाणकी येथील व्यवसायाने मेकॅनिकल असलेल्या व्यक्तीने रमजान महिन्याचे औचित्य साधत पक्ष्यांसाठी घरी पाणपोई सुरु केली आहे. 
शेरू भाई म्हणून परिचित असलेले मेकॅनिकल हे आपल्या मोकळ्या स्वभाव मुळे संपूर्ण ढाणकी तसेच आसपास च्या गावात सुद्धा प्रसिद्ध आहेत.  कुठेही कोणाची गाडी बंद पडली तर कोणतीही वेळ असो शेरू भाई हजर होतात.  
माणसा साठी तर जागो जागी पाणपोई ची सुविधा असते.  मात्र मुक्या पशु पक्ष्या साठी कोणीही आज विचार करताना आढळत नाही.  मात्र हा विचार शेरू भाई यांच्या मनात आला आणि त्यांनी घरीच पक्षासाठी झाडा पाण्याचे गाडगे,  तसेच खाण्यासाठी तांदूळ ठेऊन चिमणी तसेच पक्ष्यांची दाना व पाण्याचा प्रश्न मिटवला. 
सद्या रमजान महिना चालू आहे.  मानवा प्रमाणेच प्राणी मात्रावर दया करण्याचा संदेश सर्वच धर्मात सांगितलं आहे.  रमजान महिना हा मुस्लिम बांधवासाठी खुप पवित्र असा महिना समजला जातो.  शेरू भाई यांनी या वर्षी रमजान महिन्याचे औचित्य साधून हा उपक्रम चालू केल्याने त्यांचे ढाणकी मध्ये खुप कौतुक होत आहे.  देशावरचे कोरोनाचे संकट लवकर दूर होवो ही प्रार्थना अल्ल्लाह कडे करत असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या