ढाणकी प्रतिनिधी -
एखाद्या व्यक्तीला मनात जर काही तरी करून दाखवाची तयारी झाली तर तो काहीही करू शकतो, या गोष्टीला इतिहास सुद्धा साक्षी आहे. आपणाला बिहार मधील दशरथ माँझी ची तर गोष्ट माहीतच आहे, पत्नीला बाळंतपणात रस्त्या अभावी वेळेवर दवाखान्यात न पोहचता आल्याने तिचा मृत्यू होतो. तेव्हा दशरथ इर्षेने पेटून पूर्ण माळ फोडून रस्ता बनवतो. व सर्व गावाचा रस्त्याचा प्रश्न मिटवतो.
त्या दशरथ माँझी प्रमाणे आजच्या काळात सुद्धा काही व्यक्ती आहेत जे लोकांसाठी काही तरी करण्याची तळमळ ठेवतात. टेम्भूरदरा येथील दत्तात्रय ब्रम्हटेके यांनी सुद्धा आपल्या जीवन भर केलेल्या नोकरीच्या बदल्यात जे सेवानिवृत्ती चे पैसे मिळतात ते टेम्भूरदरा ते अकोली या पांदनरस्त्या साठी खर्च करून होणारी तसेच शेतकऱ्यांची होणारी फरफट वाचवली ब्रम्हटेके हे वे.को. ली मध्ये कर्मचारी होते व दोन वर्षा पूर्वीच ते सेवानिवृत्त झाले.
दत्तात्रय ब्रम्हटेके नेहमीच गावासाठी काहींना काही करत असतात. त्यांनी रस्त्यासाठी होणारी गावकरी तसेच शेतकऱ्याचे हाल पहिले होते, म्हणून स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने टेम्भूरदरा ते अकोली पांदनरस्त्याचे काम चालू केले. त्या साठी लागणाऱ्या खर्चसाठी आपले सेवानिवृत्तचे पैसे सुद्धा दिले. 2 किमी रस्ता बांधण्यासाठी त्यांना तब्बल 5 लाख रुपये खर्च आला. मात्र त्या मुळे शेतकऱ्यांची सोय झाल्याने मनाला समाधान लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

0 टिप्पण्या