बोगस बियाणे विक्रेत्या विरुद्ध पंचायत समिती उमरखेड येथे तक्रार.



अकोली प्रतिनिधी (अनिल राठोड )
 बोगस बियाणे विक्री केल्याबद्दल फुलसावंगी येथील गौरीशंकर ऍग्रो एजन्सी च्या  मालकाविरुद्ध विभाग पंचायत समिती उमरखेड यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. 
         बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दराटी या गावातील शेतकऱ्यांनी फुलसावंगी येथील कृषी बियाणे विक्रेता गौरी शंकर ऍग्रो एजन्सी च्या विरोधात पंचायत समिती उमरखेड ला तक्रार दिली आहे.  येथील शेतकऱ्यांनी  माणिक मोती सेल या कंपनीचे महासागरTAG 24 हे भुईमुगाचे वाण दिनांक 20 व 21 /01/2020 रोजी खरेदी केले. परंतु आज रोजी या बियाणाची पूर्ण वाढ होऊनही त्यांना शेंगा आल्या नाही. मात्र इतर कंपनीच्या बियाणं शेंगा आल्या असल्याने आपली फसगत झाली असून संबंधित दुकानदाराने आपली फसगत केल्याची बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने सर्व शेतकऱ्यांनी याची तक्रार कृषी विभाग,  पंचायत समिती उमरखेड ला दिली.  व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या