ढाणकी प्रतिनिधी (संभाजी गोरटकर )
येथील निराधार महिला श्रीमती प्रमिला येलूरवार यांचे दर महिन्याला येणारे मासिक वीजबिल महावितरण येथील सहाय्यक अभियंता ठाकरे यांनी स्वतः भरून दिलेल्या शब्दाला ते चांगले आहेत.
नगरपंचायत निवडणूक चालू असताना उमेश योगेवार यांनी सदर महिला ही अनेक वर्षा पासून अंधारात जीवन जगत असल्याचे अभियंता योगेश ठाकरे यांच्या कानावर टाकले.
तेव्हा क्षणाचाही विचार न करता त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे भरून येलूरवार आजी ला वीजमीटर उपलब्ध करून दिले. व ती हयात असे पर्यंत तिचे येणारे विज बिल भरणार असल्याचे घोषित केले होते. त्या दिलेल्या शब्दाला लक्षात ठेऊन त्यांनी आज तिचे विज बिल भरले. त्यांच्या या कार्या बद्दल ढाणकी मधून त्यांचे कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या