ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी व परिसरात सध्या वापर करून फेकलेले मास्क वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देत असून त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
आज कोरोनामुळे संपूर्ण जगाची दयनीय अवस्था झाली आहे. विषाणूचा संसर्ग इतका झपाट्याने वाढत असून आता महाराष्ट्रात सुद्धा कोरोना आपले हातपाय पसरताना आपण वेगवेगळ्या बातम्या मधून ऐकत आहोतच. कोरोनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण भारत सध्या लोकडाऊन आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्गाला काही प्रमाणात आळा बसला.
कोरोना पासून बचाव करण्यासाठी शासना तर्फे वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असून, त्यावर शिंकताना, किंवा खोखलताना मास्क किंवा रुमाल वापरणे गरजेचे आहे, तसेच आपल्या तोंडावाटे कोरोना विषाणू शरीरात जाऊ नये या साठी मास्क चा वापर करणे अगत्याचे आहे.
मात्र ढाणकी व परिसरामध्ये वापर करून फेकलेले मास्क ढाणकी करांची चिंता वाढवताना दिसून येत आहे. जुन्या बस स्टॅन्ड तसेच शासकीय रुग्णालय परिसरात लोकांकडून सर्रास पणे मास्क रस्त्यावर फेकलेले आढळून येत असून या द्वारे सुद्धा वेगवेगळ्या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
मास्क चा वापर झाल्या नंतर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे अगत्याचे असून, वापर झाल्यावर एक तर जमिनीत पुरने अथवा जाळून नष्ट करणे गरजेचे आहे. वापरले मास्क वर सुद्धा अनेक प्रकारचे विषाणू असतात ते विषाणू जर निरोगी माणसाच्या संपर्कात आलेत तर आजारांना निमंत्रन होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या परिस्थिती मध्ये जबाबदार नागरिक बनून वापरलेले मास्क रस्त्यावर न फेकता योग्य ते विल्हेवाट जर नागरिकांनी लावली तर या कोरोना लढ्यात आपली सुद्धा मदत होईल.

0 टिप्पण्या