(गावाकडच्या बातम्या कार्यकारी संपादक गोपाल गौरवाड ढाणकी)
ढाणकी शहरातील दिवस भर कर्तव्य बजावणाया ढाणकी नगरपंचायत चे कर्मचाऱ्यांना कोरोना संसंर्ग टाळण्यासाठी ढाणकी शहरातील शिवसेना व युवासेना तर्फे मास्क व सॅनेटायझर वाटप करण्यात आले आहे. शिवसेना शहर ढाणकी ही नेहमीच समाजकार्यात पुढे असते, वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवणे आणि होईल तशी समाजाची सेवा करणे हे शिवसेने अंगिकारले व्रत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवून दिलेल्या 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण या तत्वला धरूनच शिवसेनेचे कार्य चालू आहे.
या वेळेस प्रमुख उपस्थिती संभाजी गोरटकर, रमेश पराते,दिलीप नंदनवार,अमोल अरमाळकर,रमेश गायकवाड, गजानन गायकवाड, कांता वासमवार,सचिन साखरे,दत्ता सुरोशे,उत्तम जाधव,बंटी जाधव, बसोनात गोरटकर,रमेश होले,नितीन ठाकूर, बाळू कोरटवाड,सुरेश राठोड इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी सोशल डिस्टन्स ठेऊन मास्क व सॅनेटायझर वाटप करण्यात आले यावेळेस ढाणकी येथील नगरपंचायत चे कर्मचाऱ्यांनी सर्वाचे कौतुक केले.

0 टिप्पण्या