ढाणकी प्रतिनिधी (संभाजी गोरटकर )
आज कोरोना संपूर्ण जगात धुमाकूळ घातला असून आपल्या सुरक्षते साठी देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे, संपूर्ण व्यवहार ठप्प असून संचारबंदी काळात आपल्याला सेवा देण्यासाठी आपले पोलीस, डॉक्टर, नर्स दिवसरात्र कोरणावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पोलीस कर्मचारी आज नागरिकांची काळजी करीत आहेत. गलोगल्या पायदळी तुडवतांना दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्तीला आज आपले कुटुंब परिवार यांच्या सुरक्षा महत्वाची वाटत आहे त्याच प्रमाणे पोलीस बांधवांनाही परिवार कुटुंब असत, परंतु स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत नागरिकांची सुरक्षा हेच आज आपले कर्तव्य समजून कोरोना विषयी जनजागृती करतांना दिसून येत आहे. पोलीस दादा घेत असलेली मेहनत ही आपल्या साठी आहे याची जाण शिवसेना, युवासेना ढाणकी शहर यांना होऊन त्यांच्या वतीने जुन्या बस्टॅंड वर ठाणेदार विजय चव्हाण, पि एस, आय रामकिसन जायभाये, रवी गीते, गजानन खरात, निलेश भालेराव, यासह इतर कर्मचाऱ्यावर फुलाचा वर्षाव करण्यात आला असून सोबत गुलाब फुल मास्क, सॅनिटाजर देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. व आपली पोलिसांप्रती असलेली कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
या वेळी शिवसेनेचे प्रकाश जाधव, माजी तालुका प्रमुख सुरेश राठोड, नगरसेवक रमेश पराते, नगरसेविका मंदाताई दिलीप नंदनवार, नगरसेविका व सभापती बांधकाम सोनम नितीन बेस, रमेश गायकवाड, तानाजी ब्रिद्राळे, डॉ. अमोल आरमाळकर, संभाजी गोरटकर, बंटी जाधव, शिवाजी फाळके, गणेश नरवाडे, रमेश होले, दत्ता सुरोशे, संजय कुंभरवार, नितीन ठाकूर, अनिल जाधव,पप्पू जमदडे , उत्तम जाधव, गजानन गायकवाड, गजानन आजेगावकर, विशाल नरवाडे, अभय सोनुने, अशोक कोरटवाड, विनोद माहेश्वरी, बसोनाथ गोरटकर, राजु शिवाल, अनिल तोडत, गजानन धोपट, आदी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.


0 टिप्पण्या