ढाणकी प्रतिनिधी
कोरोना मुळे झालेल्या लॉकडाऊन चा फायदा काही समाजातील व्यक्ती घेत असून जीवनाश्यक वस्तूची दामदुप्पटी ने विक्री गावातील छोटे व्यापारी करत असून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे.
नगरपंचायत ढाणकी ने जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे दिनांक 14 एप्रिल च्या पत्राच्या अनुषंगाने यांच्या आदेशाची अंबलबजावणी करताना ढाणकी शहरातील काही मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली, मात्र ढाणकी शहरातील काही गल्ली बोळी तील लहान दुकानदार मात्र आपल्या मनमानी भावाने सामानाची विक्री करत आहेत. ढाणकी प्रमाणे आसपासच्या खेड्यात सुद्धा अश्या प्रकारे विक्री सुरु आहे.
शासनाने अवैध भाव वाढ रोखण्यासाठी सर्व दुकानदाराला आपल्या दुकानावर भाव फलक लावणे गरजेचे केले आहे. मात्र बरेचश्या लहान व्यापाऱ्यांनी मात्र फलक लावले नाही.
तसेच शासनाने बंदी घातलेल्या गुटखा तसेच तंबाखू विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू असून त्याची विक्री दुप्पट भावाने चालू आहे. बंद असलेला गुटखा मिळतोच कसा? हा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे.
काही दिवसापूर्वीच उमरखेड पोलसांनी 8 लाखाचा गुटखा पकडला होता. त्यामुळे गुटखा माफियांचे चांगलेच धाबे दणाणले होते. तरी सुद्दा गुटखा विक्री लहान किराणा दुकानात राजरोस पणे चालू असून संबधीतांवर कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहेत.

0 टिप्पण्या