आकोलीतील विलगीकरण कक्षाला तहसिलदार खंडारे यांची आकस्मिक भेट.

अकोली प्रतिनिधी (अनिल राठोड )
शासनामार्फत ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची सुविधा करून देण्यात आल्यामुळे काही मजूर आकोली येथे आल्यानंतर त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून गावामध्ये न येऊ देता गावातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष चिन्नावार यांच्या सहकार्याने मातोश्री चंद्रभागाबाई चिन्नावार महाविद्यालयात विलगिकरण कक्ष स्थापन करून 15 नागरिकांना तेथे ठेवण्यात आले. सदर मजुरांची तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंदा डोने यांचेमार्फत करण्यात आली.
24 एप्रिल रोजी उमरखेड तहसीलदार रुपेश खंडारे अचानक विलगिकरण कक्षास भेट देऊन उपस्थित मजुरांची चौकशी करून सोई सुविधांची पाहणी केली तसेच सदर मजुरांना संचारबंदी संदर्भात माहिती देऊन नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. मजुरांना पाण्याची व इतर सोय करण्यासाठी व लक्ष ठेवण्यासाठी पंचायत समितीचे माजी सभापती प्रविण पाटील, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक शिवप्रसाद येळकर, तलाठी गजानन सुरोशे, ग्रामसेवक एफ. एल. शेख, मुख्याध्यापक दत्तात्रय भोयर, माजी सरपंच नवलविजय पवार, कोतवाल कल्याण सोळंके, ग्रामपंचायत कर्मचारी अमोल जामकर, संजय दवणे, नितीन कदम, आशा सेविका उपस्थित होते. तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीनेे मजुरांसाठी केलेल्या सुविधांचे तहसीलदारांंनी कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या