अन रात्री 2 वाजता सुरु झाला ढाणकी शहराचा विज पुरवठा.


ढाणकी न्यूज नेटवर्क 
सध्या संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरु असून फक्त अत्यावश्यक सेवेलाच परवानगी देण्यात आली आहे.  विजवितरण सुद्धा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने कंपनीचे कर्मचारी तसेच अधिकारी सुद्धा या टाळेबंदी च्या काळात आपले कार्य चोख पणे बजावत आहेत. 
सविस्तर वृत्त असे कि,  काल सायंकाळी ढाणकी शहर व परिसरात अचानक आकाशात ढग दाटून येऊन विजेच्या कडकडाट सह पाऊस सुरु झाला.  जोऱ्याचा वारा सुटल्या मुळे तसेच विडुळ जवळ विज खांबावर विज कोसळल्या मुळे ढाणकी चा विज पुरवठा बंद होऊन शहरांत अंधार पसरला. 
ही बाब ढाणकी विज वितरण कंपनीचे सहा. अभियंता योगेश ठाकरे यांना कळताच त्यांनी आपल्या कर्मचार्यांना घेऊन घटना स्थळ गाठले.  अथक प्रयत्न करून अंदाजे रात्री 2 वाजता ढाणकी चा विज पुरवठा सुरळीत सुरु केला. संपूर्ण काम करण्या साठी कर्मचार्यांना सकाळी आठ वाजे पर्यंत काम केले.  महावितरण कर्मचारी तसेच अभियंता योगेश ठाकरे यांचे शहरात कौतुक होत आहे. मागील तीन दिवसापासून सतत त्यांचे रात्री काम चालू आहे. 

            महावितरण कर्मचारी यांचा उत्साह वाढावा म्हणून रात्री शिवसेनेचे बंटी जाधव,  प्रहार चे सय्यद मजीद,  पत्रकार नागेश महाजन व नागरिक सुद्धा घटना स्थळी पोहचले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या