अकोली प्रतिनिधी (अनिल राठोड )
आकोली येथे तंत्रस्नेही मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक शिवप्रसाद रामप्रसाद येळकरने डिजिटल माध्यमांचा उपयोग करून ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली. या निशुल्क स्पर्धेसाठी येळकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनचरित्रावर व कोरोना संदर्भातील सामान्यज्ञान तसेच गावातील स्थानिक स्वराज्य संस्था या विषयावर 35 बहुपर्यायी प्रश्नांची लिंक 'आदर्शगाव आकोली' व्हाट्सअप ग्रुप वर दिली. परीक्षेला 140 पालक व विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्यामुळे डिजिटल साक्षरतेस चालना मिळाली. या स्पर्धेतून महापुरुषांचे जीवन चरित्र अभ्यासून विद्यार्थ्यांची वैचारिक शक्ती तर वाढलीच असून त्याच बरोबर कोरोना विषयी जनजागृती हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते. Eपरीक्षेत भाग घेतलेल्या 100 विद्यार्थ्यांना एमव्हीएसटीएफ ग्रामकोष निधीतून सरपंच संगीताताई प्रविण मिराशे यांचेकडून रजिस्टर व पेन बक्षीस रूपात घरपोच वितरित करण्यात आले. पंचायत समिती माजी सभापती प्रविण पाटील मिराशे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष चिन्नावार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. बक्षिस वितरणासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चंपत वाघमारे, दिगंबर देवसरकर यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या