सामाजिक जाणीव लक्षात घेऊन शिवसेना व युवासेना तर्फे महावितरण कर्मचारी यांना मास्क व सेनेटायझर वाटप.


ढाणकी प्रतिनिधी  (संभाजी गोरटकर )
कोरोना सारख्या संसर्गजन्य विषाणूला आळा घालण्या साठी अद्यापपर्यंत तरी कोणतीही लस उपलब्ध झाली नाही.  मात्र आपल्या देशाचे वैज्ञानिक जिवाचे रान करून लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.  यावर लस निघेलही,  मात्र सध्या तरी प्रतिबंधात्मक उपाय करणे हाच एक उपाय आहे.  ही बाब लक्षात घेऊन ढाणकी शहर शिवसेना व युवासेना यांच्या कडून अत्यावश्यक सेवेत मोडणारे,  टाळेबंदी मध्ये सुद्धा अखंडित वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांना मास्क आणि सेनेटायझर चे वाटप करून कोरोनाला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. 
         या प्रसंगी  ढाणकी शहरात बदली होऊन आल्या पासून आपल्या कामा चा धडाका लावणारे,  कर्तव्यनिष्ठ,  विज वितरण कंपनी ढाणकी चे सहाय्यक अभियंता योगेश ठाकरे यांनी शिवसेनेच्या या उपक्रमाबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानले.  
या वेळी शिवसेनेचे जेष्ठ तानाजी बिद्राळे, डॉ. अमोल आरमाळकर,बंटी जाधव,  युवासेना शहर प्रमुख संभाजी गोरटकर, शिवसेना विभाग प्रमुख दत्ता सुरोशे, युवासेना उप तालुका विशाल नरवाडे, पपू जम्दडे, मनोज राहुलवाड, विनोद माहेश्वरी, बसोनाथ गोरटकर, बंडू गोपेवाड, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.  विशेष म्हणजे सामाजिक अंतर चे पूर्णपणे पालन करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या