ढाणकी प्रतिनिधी-
केराणा या विशाण्ुाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील संपुर्ण बाजारपेठा दिनांक 22 मार्च पासुन ते दिनांक 14 एप्रील पर्यंत बंद ठेऊन लॉकडाउन घोषित करून कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारणे प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे गरीब, मजूर, निराधार ज्यांना कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नाही अश्या लोकांना खाण्या पिण्याचे तसेच जीवनावश्यक वस्तूचे किटांचे वाटप शिवसेना ढाणकी मार्फत करण्यात आले. या किट करंजी, मेट, कृष्णापूर चिंचोली तसेच आसपास च्या खेड्यात वाटप करणार आहेत.
सध्या अनेक समाजसेवी संस्था, राजकीय पक्ष धान्य किट वाटताना दिसत आहे. मात्र मदत कमी आणि फोटोच जास्त दिसत होते. या बाबीला बगल देत ढाणकी शहर शिवसेना व युवासेनेने कुठलाही देखावा न करता गुप्त पणे गरजूंच्या घरी धान्य नेऊन दिले, धान्य वाटप करताना शिवसैनिकांनी नियमाचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारीं घेतली.
यावेळी ढाणकी मधील सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
सध्याची परिस्थिती पाहता गरजू ना धान्य वाटप करणे खूप गरजेचे आहे त्याच गरजेला ओळखून आम्ही शिवसेना ढाणकी मार्फत धान्य वाटण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हे सर्व गुप्त पद्धतीने होणार आहे.
एक शिवसैनिक


0 टिप्पण्या