सतिश जाधव यांनी उचलला शंभर व्यक्तीचा राशन खर्च.


ढाणकी न्यूज नेटवर्क 
सध्या संपुर्ण देशात लाॅकडाउनची स्थीती आहे. केंद्र शासनाने येत्या 14 एप्रील पर्यंत संपुर्ण देशात संचारबंदी घोषीत केली असल्यामुळे सर्व सामान्य कूटूंबियांचे हाल होत आहेत. मध्यम वर्गीयांचे ठिक आहे मात्र ज्या व्यक्तींना रोज मजुरी केल्या शिवाय आपली दिनचर्चा चालत नाही अशा व्यक्तींना मात्र लाॅकडाउनचा फार मोठा फटका बसला आहे.
मात्र समाजा मध्ये असेही काही व्यक्ती आहेत की, ज्यांना सामान्य लोकांसाठी काही तरी करण्याची इच्छा असते, अशाच व्यक्तींमध्ये नम्रता टेक्नीकलचे मालक सतिष जाधव यांचे नाव घेतले जाते. ते नेहमी समाजकार्यामध्ये पुढे असतात. काही दिवसापुर्वी आपल्या  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोणा व्हायरस शी दोन हात करण्यासाठी पी.एम फंड निर्माण केला होता त्यामध्ये त्यांनी 10,000 रूपयाचे योगदान दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये सुध्दा 10,000 रूपयाची सहयोग राषी देवुन राष्ट््रा प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली होती. 
कोरोणा व्हायरस ला प्रतिबंध म्हणुन लाॅकडाउन घोषीत केले असल्यामुळे सर्वसामान्य कूटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी काही सामाजीक संघटना, राजकीय पक्ष आपआपल्या परीने मदत कार्य करत आहेत. याच बाबीला हेरून सतिश जाधव यांनी त्यांचे गाव चिंचोली ढाणकी येथील शंभर व्यक्तीचा   राशन चा खर्च उचलुन त्या गरीब कुटूंबाला आधार दिला आहे. त्यांनी गावातील प्रत्येक कुटूंबाला जे राशन कार्ड वर धान्य मिळते त्याचे जे काही बील होईल ते देण्याचे कबुल केले असुन त्यामुळे तब्बल शंभर व्यक्तीना  लाॅकडावुनच्या काळात आधार झाला आहे.
अतिषय गरीब परिस्थीती मधुन आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर त्यांनी  आज समाजामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आपणही समाजाला काही देणे लागतो ही भावना मनात ठेवुन आपन सेवाभाव वृत्तीने भविष्यात ही असेच कार्य करत राहण्याचा मानस असल्याचे त्यांनी बोलताना सांगीतले. त्यांच्या या कार्यामुळे ढाणकी परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या