ढाणकी न्यूज नेटवर्क
ढाणकी येथे पोलिसांसाठी सेनेटायझर कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
सद्या कोरोना व्हायरस चा धोका सगळी कडे जाणवू लागला आहे. त्यामुळे आपल्या जिवाची पर्वा न करता संचारबंदी दररम्यान आपली सेवा बजावणारे पोलीस बांधवानी घरी जाताना स्वतःला निर्जंतुक करून घरी जावे या उद्देशाने बजरंग लाल कॉम्प्लेक्स येथे हा कक्ष स्थापन केला आहे.
देशाची सध्याची स्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन चा कालावधी वाढऊन 30 एप्रिल पर्यंत केला आहे. त्यामुळे सर्वात जास्त कामाचा बोजा हा पोलीस तसेच डॉक्टर, नर्स, व स्वच्छता कामगारावर पाडत आहे. रोज त्यांना वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात याव लागते. त्यामुळे या विषाणूच्या फैलाव होण्याचा धोखा जास्त असल्यामुळे पोलिसांनी घरी जाताना स्वतःला निर्जंतुक करून घेतल्यास याचा संसर्ग त्यांच्या कुटुंबाला होणार नाही हा प्रामाणिक उद्देश ठेऊन ढाणकी शहरातील रोहित वर्मा, बंटी जाधव व महेश पिंपरवार यांनी स्वतः खर्च करून हा कक्ष स्थापन केला.
त्यांच्या या कार्यामुळे ढाणकीत सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता सेनेटायझर कक्षाची आवश्यकता खूप जास्त होती. आमची ही गरज ओळखून रोहित वर्मा, बंटी जाधव व महेश पिंपरवार यांनी हा कक्ष तयार करून दिल्या बद्दल मी त्यांचे आमच्या टीम तर्फे आभार मानतो. असे मनोगत ठाणेदार विजय चव्हाण यांनी व्यक्त केले.

0 टिप्पण्या