जि.प.शिक्षक संघाने केली सव्वालाख रुपयाची मदत.


ढाणकी न्यूज नेटवर्क 
देशावर कोसळलेल्या कोवीड-19 या अस्मानी संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी व मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे, त्या पार्श्वभूमीवर,उमरखेडच्या  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ रं.नं 235 ने एक स्त्युत उपक्रम हाती घेतला.
‌होय मी संवेदनशील शिक्षक,.....
संकटकाळी माझही योगदान....
हा उपक्रम व्हाँट्सप ग्रुपवर शिक्षकटीमकडुन कळकळीने राबविला गेला.
नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासणारा घटक म्हणुन शिक्षकाकडे पाहिले जाते,आतातर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा ह्या संकटाचे साक्षिदार होण्यापेक्षा भागिदार होऊया,असे म्हणत मदतीचे आवाहन करण्यात आले.
आणि हा हा म्हणता,अवघ्या तिन दिवसात
समाज म्हणून माझंही काही देणं लागते...ह्या भावनेन ओतप्रोत भारलेल्या तब्बल *152* शिक्षकांनी स्वयंस्फुर्तिने  हजारोची मदत केली व आपल्या सवंदनशीलतेचा परिचय दिला.ह्यामध्ये महिला शिक्षकांचा सहभाग लक्षणीय होता.उमरखेडचे, गटशिक्षणाधिकारी,श्री.पी.आर.खांडरे,साहेब,केंद्रप्रमुख श्री.अनिल बोपिनवार ,श्री.रामदास केंद्रे,श्री.घुगेसह इतरही उद्योजक मित्रांनीही उस्फुर्तपण ह्यामध्ये योगदान दिले हे विशेष.
या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळाला.

 *तब्बल 121600₹ (एक लाख सव्वीस हजार रुपये )मदतनिधी संघटनेकडे जमा झाला. हा निधी कोरोना संकट निवारण्यासाठी शासनाने चालवलेल्या लढ्यातील योद्ध्यांचे मनोधैर्य वाढावं,ह्यासाठी मुख्यमंत्री सहायता नीधीत जमा करण्यात आला.तसा एक लाख एकवीस हजार सहाशे रुपयांचा धनादेश नुकताच उमरखेडचे उपविभागीय अधिकारी श्री.स्वप्नील कापडणीस ह्यांच्याकडे टीम 235ने सुपुर्द केला.*
जि.प.प्रा.शिक्षक संघ रंनं 235 ने नेहमीच अनेक सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारी संघटना म्हणुन नावलौकिक मिळवलेला आहे.या नीधीव्यतिरिक्त कोरोना निवारणार्थ चालवलेल्या अनेक उपक्रमातही सदर शिक्षक उस्फुर्तपणे मदत करत आहेत. 
विद्यार्थ्यांसाठी work from home सारख्या अभ्यासग्रुपची निर्मिती करुन अध्यापन कार्य करत आहेत.
शिवाय आपापल्या शाळेच्या गावी कोरोना संदर्भात जनजाग्रुतीचे कामही हे शिक्षक  करत आहेत.
सदर उपक्रम यशस्वी करणाऱ्या टिममध्ये
श्री.आनंद कुंबरवार, श्री.गणेश कदम, श्री.सुरेश वाघ,डॉ.विनय चव्हाण,श्री.कृष्णा पाचकोरे ,श्री.महादेव वाघ ,श्री.नारायण गारशेटवाड,श्री.देवानंद सोमवंशी,श्री.प्रकाश मेहेशकर,श्री.सुनील गिते ,श्री.मंगेश कदम, श्री.गजानन राठोड ,श्री.नागेश मिराशे ह्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
संघटनेच्या हाकेला ओ देत मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानत भविष्यातही निर्माण होणाऱ्या अडचणींतही आम्ही टिम 235 चे शिक्षक सदैव खंबिरपणे उभे राहु असा विश्वास जि.प.प्रा.शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष श्री.आनंद कुंबरवार यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या