ढाणकी प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमी वर संपूर्ण देशात सध्या लॉक डाऊन चालू आहे. त्या मुळे महाराष्ट्रात सुद्धा संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. अश्या या कठीण परिस्थिती मध्ये आपल्या देशाचे डॉक्टर, पोलीस, नर्स, स्वच्छता कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा नं करता कोरणाशी दोन हात करण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावत आहेत.
कोरोना वर अद्याप तरी कोणतीही लस उपलब्ध झाली नसून आपल्या देशाचे शास्त्रज्ञ ती तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, सध्या कोरोनावर उपचार म्हणजे स्वतःचा घरातच राहणे, आणि संसर्ग टाळणे एवढाच उपाय आहे. मात्र शहरातील काही नागरिक या बाबीला गांभीर्याने नं घेता पोलिसांना सहकार्य नं करता संचारबंदीच्या काळात बिनधास्त पणे हिंडत होते तेव्हा त्यांना आपल्या खाक्या दाखवण्यासाठी आणि आम्ही आपल्या साठी रस्त्यावर आहोत तुम्ही फक्त घरात राहा. असा संदेश देण्यासाठी बिटरगाव पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने ढाणकी शहराच्या मुख्य रस्त्यावरून पथसंचलन केले.
राज्य राखीव पोलीस दलाचे उपनिरीक्षक डी. एल मोरे व पंधरा जवान व बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय चव्हाण, उपनिरीक्षक रामकिसन जायभाये, व अठरा कर्मचारी, व पाच गृहरक्षक दलाचे कर्मचारी या संचालन मध्ये सहभागी झाले होते.


0 टिप्पण्या